नयनतारा सहगल प्रकरण, झुंडशाही प्रवृत्तीने महाराष्ट्राच्या परंपरेला लागले गालबोट

Foto

औरंगाबाद- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळमध्ये होत आहे. यासंमेलनाच्या उद्घाटनासाठी इंग्रजीच्या साहित्यिक नयनतारा सहगल यांना निमंत्रित करण्यात आले होते. पण काही समाजविघातक शक्‍तींनी सहगल यांच्या नावास विरोध केला. त्यामुळे महामंडळ आणि संयोजकांनी सहगल यांचे निमंत्रण रद्द केले. देशात सांप्रदायिक शक्‍तीची झुंडशाही वाढली आहे व या झुंडशाहीपुढे साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी झुकते घेतल्याने महाराष्ट्राच्या परंपरेला गालबोट लागले.  या प्रकरणाने महराष्ट्राची मान मात्र शरमेने खाली गेली एवढे मात्र खरे. 

 

अखिल भारतीय मराठी साहित्याचे १२ वे साहित्य संमेलन ११ ते १३ जानेवारीपर्यंत यवतमाळमध्ये होत आहे. या संमेलनाच्या उद्घाटक म्हणून सर्वानुमते इंग्रजी साहित्यिका नयनतारा सहगल यांचे नाव निश्‍चित करण्यात आले. पण त्यानंतर सहगल यांच्या नावाला स्थानिक मनसेच्या कार्यकर्त्यांनी विरोध करून संमेलन उधळून लावण्याचा इशारा दिला. त्यावर प्रसिद्धीमाध्यमातून टीका झाल्यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हा मनसेचा निर्णय नाही व आमचा नयनतारा सहगल यांना विरोध नाही, असे स्पष्ट केले. पण त्यानंतर ही सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय महामंडळाच्या सांगण्यावरून संयोजकांनी घेतला. पण निमंत्रण रद्द करण्यामागे राजकीय दबाव असल्याचे बोलले जाते.  

 

या संमेलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते. सहगल या परखड मत व्यक्‍त करणार्‍या साहित्यिका म्हणून परिचित आहे. त्यांनी तीन वर्षांपूर्वी देशात वाढत असलेल्या असंहिष्णतेच्या निषेधार्थसरकारने त्यांना दिलेला सरकारी पुरस्कार परत केला होता. त्यानंतर देशात अनेक व्यक्‍तींनी सरकारी पुरस्कार परत केले होते. गेल्या चार वर्षांत देशात जातीय शक्‍तींत मोठी वाढ झाली एवढेच नव्हे तर गोमाता संरक्षणाच्या नावाखाली माणसांच्या हत्या करण्याच्या घटना वाढल्या. सत्ताधारी मंडळी मनात येईल असे विधान करून दशहत पसरवित आहे. जाती धर्मात तेढ निर्माण करीत आहे. या सर्व विषयांवर मुख्यमंत्र्यांसमोर नयनतारा सहगल या विचार व्यक्‍त करतील. सरकारवर टीका करतील म्हणून त्यांचे निमंत्रण रद्द केल्याचे साहित्यिकांमध्ये बोलले जात आहे.

 

शुक्रवारी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवा पत्नीच्या हस्ते करण्यात आले. ही वेळ साहित्यिकांवर कशामुळे आली याचा उहापोह संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात झाला. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी झुंडशाहीपुढे साहित्यिकांनी झुकते घेतल्याने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेल्याचे सांगितले. साहित्य क्षेत्रातील संमेलने हे शासनाच्या पैशावर होत असल्याने साहित्यिकांना सत्ताधार्‍यांच्या इशार्‍यावर नाचावे लागत आहे. त्यामुळे साहित्यिकांनी सरकारी निधी न घेता संमेलने भरवावीत आपले विचार, आपली मते परखड व्यक्‍त करायला हवी व समाजात वाढत असलेल्या असंहिष्णेते विरुद्ध उभे राहिले पाहिजे. 

 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker